Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com

HEAD MASTER


Mr. C.Y. Jadhav

(B.Sc., B.Ed., D.S.M.)

                 मुख्याध्यापकांनी कार्यभार स्वीकारल्यापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून ते गुणवत्त्तापूर्ण भौतिक सुविधांकडे काटेकोरपणे लक्ष दिले आहे. यामध्ये संस्थानकालीन १९४९ ची जुनी इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती . प्रथम या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम हाती घेऊन संस्थेच्या मदतीने व माननीय अरुण(अण्णा) लाड व अ‍ॅडव्होकेट प्रकाश(भाऊ) लाड यांच्या सहकार्यातून अद्यावत असे ई-लर्निंग स्कूल निर्माण केले व या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसेच बाह्य तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन , उद्बोधन वर्ग आयोजित केले व शिक्षकांना गुणवत्ता पूर्ण करण्याचे काम केले आहे . तसेच मुंबईतील आदर्श शाळांना भेटी देऊन त्या शाळेतील आदर्श पैलू शिक्षकांमध्ये आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

                 बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस ची विशेष सुविधा उपलब्ध केली आहे . विविध स्पर्धा परीक्षेतील मुलांच्या गुणवत्तेचा आलेख हा चढत्या क्रमाने येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना CET, NEET , JEE तसेच CA Foundation इत्यादी Entrance Examination Center च्या मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

                 शालेय विद्यार्थ्यांना व सहकाऱ्यांना शिस्तीच्या सवयी लावून युनिफॉर्म पासून ते आय -कार्ड पर्यंत या गोष्टींची पूर्ती केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे . त्यामुळेच काही विद्यार्थी अगदी विभागीय पातळीपर्यंत क्रीडाक्षेत्रामध्ये भरारी घेत असलेले दिसून येत आहेत.

                 या पुढील कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा निश्चितपणे उंचावण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न करण्यात येतील . शाळेच्या निकालाचा आलेख सातत्याने चढता राहण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम योजनेत येतील. भविष्य काळामध्ये विविध परीक्षांना सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना संगणकाचगे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संगणक प्रयोगशाळा अद्यवत करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न करणेत येईल .

                 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देण्यासाठी अद्यावत व सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या आहे .


© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor